खाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता भारतीय बाजारपेठेवर दिसू लागला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने मावळातील नागरिकांसमोर स्वयंपाकासाठी पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेक गृहिणींनी पुन्हा एकदा कोळसा शेगडीचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र या वाढलेल्या मागणीमुळे कोळशाच्या दरातही तब्बल १० टक्क्यांची वाढ झाली आहे.पूर्वी कोळसा वखारीकडे सहसा सामान्य नागरिक जात नसत. हॉटेल व्यवसायिक तंदूर भट्टीसाठी लाकडी कोळसा घेत असत, तर काही मोजके लघुउद्योजक दगडी कोळसा वापरत होते.