पावसाने मागील पंधरा दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात हुलकावणी दिल्याने आता पिके वाळून जात असून हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात अल्पशा पावसावर 83 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पण पाऊसच पडत नसल्याने अर्धापूर तालुक्यातील शेलगावचे प्रयोगशील शेतकरी महेश राजेंगोरे यांचं 5 एक्कर वरील सोयाबीन पावसाअभावी वाळुन जातं आहेत.