पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातून खरीपाचे पिक तर गेलेच आहे मात्र आता शेतीपुरक दुग्ध व्यवसायही अडचणीत येण्याची शक्यता आहे.. पाण्याअभावी चारापिके कमी झाल्याने गाईंना लागणाऱ्या चाऱ्याचे दर आत्ताच गगनाला भिडले आहेत..