हवामान विभागाकडून जालना जिल्ह्याला 4 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची चिंता वाढल्याचा पाहायला मिळत आहे. अशातच बदनापूर तालुक्यातल्या शेलगाव येथील हरी अंभोरे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने अवकाळी पाऊस वादळी वारा आणि गारपीट होण्याच्या भीतीने आपल्या 2 ते अडीच एकर डाळिंब च्या बागेवर पूर्णपणे आच्छादन केलं असून संभाव्य नुकसान टळेल आणि बाग सुरक्षित राहील यासाठी हा एक प्रयोग केला आबे.