बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथे असलेल्या अवादा एनर्जी प्रकल्पाच्या समोरील विजेच्या खांबावर दारूच्या नशेत रात्री एक तरुण चढला आणि नंतर तिथून उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकीही दिली. या तरूणाचे नाव वसंत केदार असून तो सांगवी गावातील राहणारा आहे. गावातील काही लोक आपल्याला त्रास देत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पोलिसांकडे केली.