सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्ते आणि पूल नसल्याने गंभीर आजारी महिलेला बांबूच्या झोळीतून नातेवाईकांनी तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं. पिंपळखुटा ते वेहगी हे अंतर आठ किलोमीटर असून, वाटेत वेहगी नदी पार करावी लागत असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.