लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागातून यापूर्वी निधी वर्ग करण्यात आल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेमुळं निधी यायला उशीर होतोय, असं म्हटलं आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.