आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात येणारे क्रूड ऑइल बंद झाले आहे. यामुळे क्रूड ऑइलचे भाव गगनाला भिडले असून त्याचे थेट परिणाम अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांवर होत आहेत. याचाच बीड मधील ठिबक सिंचनचे पाईप बनवणाऱ्या कंपनीवर देखील थेट परिणाम झाला आहे. क्रूड ऑइल मिळत नसल्याने आणि किंमती दुप्पट, तिप्पट झाल्याने परिणामी बीड मधील ठिबक सिंचन पाईपचे उत्पादन कंपन्यांना बंद करावे लागले आहे. जोपर्यंत हे युद्ध थांबत नाही तोपर्यंत परिस्थिती सुरळीत होणार नाही...