पालघर शहरात ईद-ए-मिलादचा उत्साह; मुस्लिम बांधवांचा भव्य जुलूस. पालघर जिल्ह्यातील विविध मुस्लिम वस्त्यांमध्येही ईद-ए-मिलाद निमित्ताने जुलूस. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए-मिलादचा उत्साह पालघर शहरात पाहायला मिळाला.