साताऱ्याहून पुण्याकडे येणाऱ्या महामार्गावरील पुणे - नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळच्या वेळेस दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातानंतर तेथील तीन ते चार वाहनांना मोठी आग लागली. या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.