उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे. मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, मदत दिली नाही असे म्हणत, त्यांनी ‘फुकटचा ताठा आणि नाव उबाठा’ या शब्दांत निशाणा साधला. आमच्या सरकारने ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले, असे सांगत शिंदे यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.