वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे शिवसेना शिंदे गटाचा 59 वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत अयोध्येतील राम मंदिर आणि जम्मू व काश्मीरमधील कलम 370 या दोन्ही मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच बाळासाहेबांचे स्वप्न अमित शाह, मोदींनी पूर्ण केलं असंही त्यांनी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.