ठाण्यात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी स्कुटी चालवून रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. ठाणे ट्राफिक गार्डन येथे तीन दिवसीय चित्रकला स्पर्धा व वाहतूक विषयक प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांची सर्जनशीलता अनुभवता येईल.