उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापौरपदावरून महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नसून, विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असल्याचे शिंदे म्हणाले. मुंबईकरांनी महायुतीला दिलेला कौल मान्य असून, आम्ही विचारधारेने एकत्र आलो आहोत.