एकनाथ शिंदे गटाचे मुंबईतील २९ नगरसेवक आज दुपारी बारा वाजता कोकण भवनात स्वतंत्र गटाची नोंदणी करणार आहेत. नोंदणी करण्यापूर्वी, हे सर्व नगरसेवक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करतील. ही नोंदणी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.