शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाने षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर त्यातही शिंदे गटावर हल्लाबोल केला. भाषणादरम्यान त्यांनी 'कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की,"ते म्हणाले कम ऑन किल मी, पण मरे हुए को क्या मारना' असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.