उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन दिले आहे. जात, धर्म या पलीकडे जाऊन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करण्यावर त्यांनी भर दिला. कुणावरही अन्याय न करता, सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणणे हे आपले कर्तव्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.