सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापूंना एकदम ओके म्हणत त्यांचे कौतुक केले. शिंदेंनी म्हटले की, शहाजीबापूंना चक्रव्यूहात पकडण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी तो भेदून सर्वांना आडवे करत विजयश्री खेचून आणली.