उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर ते नाराज असून, अकार्यक्षम मंत्र्यांना पदावरून दूर केले जाईल. कार्यक्षम मंत्र्यांवर पक्षबांधणीची जबाबदारी सोपवली जाईल आणि नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.