उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावरील सातत्यपूर्ण टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून होत असलेल्या वैयक्तिक शिव्याशापांना आणि आरोपांना कामातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी म्हटले आहे की, टीकाकार कितीही टीका करोत, मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन आणि त्यातूनच जनतेला उत्तर मिळेल.