प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, शिवसेनेचे सर्व निर्णय मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. सकाळी 11 वाजता यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत. संघटनेला बळकट करणारे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे निष्ठावान शिवसैनिकच उमेदवारीसाठी पात्र ठरतील, असे पक्षाचे धोरण आहे.