सातारा येथील दरे गावातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री उत्तेश्वर ग्रामदैवत यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कुटुंब दरे गावात मुक्कामी आलेले. उतेश्वर ग्रामदेवतांच्या यात्रेसाठी दरवर्षी ते गावी येतात. यावर्षी देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून त्यांनी कुटुंबासह शंभू महादेवाच्या चरणी माथा टेकत दर्शन घेतले. दरे गावचे ग्रामदैवत असलेल्या उत्तेश्वर यात्रेला यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी तसेच कुटुंबीयांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अभिषेक आणि पूजाअर्चा केली.