उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईत अडकलेल्या भारतीय नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांच्या निवास, भोजन आणि पुढील प्रवासाची व्यवस्था सुनिश्चित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात असून, त्यांच्याशी सतत संपर्कात राहण्यासाठी गट तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.