चंद्रपूर आणि नागपूरच्या आरक्षणावरून अनिश्चितता असतानाही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाने तीन वर्षे झोपा काढल्या का, असा सवाल उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परिस्थिती जैसे थे राहिल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.