चांदवड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार असून, त्यासाठी निवडणूक आयोगाकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यापूर्वी नगरपालिकेतील उर्वरित नगरसेवक पदाच्या जागांसाठी तसेच थेट नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती दरम्यान, आज चांदवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधील एका रिक्त जागेसाठी स्वतंत्रपणे निवडणूक प्रक्रिया पार पडली.