पुण्यातील भोर येथे यंदा निवडणूक आयोगाकडून खास महिलांसाठी पिंक बुथ तयार करण्यात आलेत. सखी मतदान केंद्र असं याला नाव देण्यात आलं आहे. महिलांसाठी डिझाइन केलेल्या या गुलाबी मतदान केंद्रावर फक्त महिला कर्मचाऱ्यांनी मतदान केलं. या मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सेल्फी पॉइंट्स देखील तयार केले आहेत..तसेच सुंदर सजावटीसह सेल्फी बूथ, कार्पेट आणि अपंगांसाठी व्हीलचेअर यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत..