नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकेच्या मतमोजणीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तर राज्य राखीव दलाचे देखील कर्मचारी सज्ज झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात होणारे मतमोजणीसाठी नंदुरबार नगरपालिकेसाठी 11 फेऱ्या होणार आहेत तर शहादा पालिकेसाठी पाच नवापूर पालिकेसाठी सहा आणि तळोदा पालिकेसाठी सात अशा 29 फेऱ्या होणार असून या होणाऱ्या फेऱ्यांसाठी निवडणूक विभागाकडून देखील कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक विभागाकडून तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 69 टक्के मतदान झालं असल्याने हे मतदान नेमका कोणाच्या बाजूने राहणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.