नाशिकच्या चांदीच्या गणपतीला अकरा किलो चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. तर मंदिरात 51 किलो मोगऱ्याच्या फुलांची सजावट केली आहे. उकाड्यापासून चांदीच्या गणपतीला थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला. नाशिकच्या रविवार कारंजा परिसरात सुप्रसिद्ध चांदीचा गणपती आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये उष्णता वाढत असल्याने मंदिरात गारवा निर्माण करण्यासाठी चंदन लावण्यात आले.