शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला. करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी आलेल्या नोटिसीची होळी केली, हातात ऊस घेऊन राजू शेट्टी यांच्यासह शक्तिपीठ विरोधी कृती समितीचे सदस्य हसुरमध्ये दाखल झाले.