पालघर जिल्हा परिषदेच्या 2112 शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल पात्र असलेल्या 26853 विद्यार्थ्यांचं शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाअंतर्गत स्वागत करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळा प्रवेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली.