नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे अग्निशमन सप्ताहानिमित्त नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आपत्कालीन मॉक ड्रिल यशस्वीरित्या पार पडली. निफाड फाट्यावर बॉम्बस्फोटाचा काल्पनिक प्रसंग उभा करून सायरन वाजताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि नागरी संरक्षण पथक घटनास्थळी दाखल झाले.