महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. कर्मचारी संघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ यांनी आंदोलन सुरू केले आहे. बढती आणि बदलीचे पूर्वीचे निकष रद्द करून शासनप्रमाणे नवीन नियम लागू केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.