मुंबई-पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकी हिल परिसर सध्या पावसामुळे निसर्गाच्या अप्रतिम रंगांनी खुलून आला आहे. डोंगररांगांवर पसरलेलं दाट धुकं, हिरव्यागार दऱ्या आणि उंच कड्यांवरून फेसाळत कोसळणारे असंख्य धबधबे... हे दृश्य पाहताना जणू निसर्गानेच चित्र रंगवल्याचा भास होतो. रेल्वे या घाटातून मार्गक्रमण करत असताना खिडकीतून दिसणारी ही नयनरम्य दृश्यं प्रत्येक प्रवाशाच्या कॅमेऱ्यात आणि मनात कायमची घर करून जातात.