कल्याण-डोंबिवलीमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त उत्साह दिसून आला. कोळी बांधव दरवर्षी पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढत दर्याला नारळ अपर्ण करत शांत होण्याचे आवाहन केलं. मिरवणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर तसेच आगरी कोळी बांधवांनी कोळी गाण्यावर ठेका धरला.