भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील तिर्री गावात रात्रीच्या सुमारास दोन अस्वलांनी शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, हे अस्वल चक्क बोरीच्या झाडावर चढून बोरे खाताना आढळले. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत एकजुटीने या अस्वलांना जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले, मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.