केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्यासंबंधीचे नियम अधिक लवचिक केले आहेत. आता नोकरीला १० वर्षे पूर्ण झालेल्या ईपीएफ सदस्यांना निवृत्तीपूर्वीच पीएफचा संपूर्ण पैसा काढता येणार आहे, ज्यामुळे ५८ वर्षांची अट शिथिल झाली आहे. या नव्या नियमांमुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींच्या वेळी मोठा दिलासा मिळणार आहे.