पहिली नोकरी सुरू करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना १५,००० रुपयांचे प्रोत्साहन देणार आहे. यासाठी EPFO मध्ये नोंदणी आवश्यक आहे. तसेच, EPFO ने पीएफ काढण्याचे नियम सोपे केले आहेत, ज्यामुळे लग्न, घरखरेदी, शिक्षण किंवा आजारपणासारख्या कारणांसाठी पैसे काढणे अधिक सुकर झाले आहे.