थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली असून गेल्या सहा दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस वर कायम असल्याने उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.