वाशिम जिल्ह्यात नवीन हळद बाजारात येण्यापूर्वीच हळदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरुवारी कांडी हळदीला किमान 15 हजार 400 रुपये ते कमाल 16 हजार 700 रुपये प्रती क्विंटल, तर गट्ट हळदीला 13 हजार 500 ते 14 हजार 700 रुपये प्रती क्विंटल दर मिळाला.