खासदार उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेसमध्ये एका आगळ्यावेगळ्या पाहुण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंगात खाकी वर्दी आणि हातात पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या एका पोलीस इन्स्पेक्टरने थेट खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मात्र हा कोणी खरा पोलीस अधिकारी नसून, आपल्या कलेच्या जोपासनेसाठी आलेला एक बहुरूपी कलाकार होता. त्याच्या संवादशैलीमुळे उदयनराजे यांना देखील हसू आवरता आलं नाही.