जळगाव महापालिका निवडणुकी नंतर देखील मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूम मध्ये ठेवून सुरक्षा केली जात आहे. महापालिकेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्ट्राँग रूम उभारण्यात आला असून त्या ठिकाणी सुरक्षेत सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत. येथे सुरक्षेसाठी एक खाजगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आला आहे.