सोलापुरातील मोहोळ मध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर सापडल्याने खळबळ उडाली. एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक पवित्रा घेतला होता.या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ईव्हीएम मशिन्स ताब्यात घेतल्या.