माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना पोहरादेवी धर्मपीठाकडून पोहोरादेवी येथील मंदिरात झाडू मारण्याची शिक्षा देण्यात आली. 'बंजारा समाज उपहिंदू म्हणून जगेल' असं हरिभाऊ राठोड यांनी विधान केले होते. त्यामुळे त्यांना पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी त्यांना शिक्षा दिली आहे. हरीभाऊ राठोड यांनी शिक्षा स्वीकारली नाही तर त्यांना पोहोरादेवी येथे बंदी घालण्यात येईल असंही जाहीर करण्यात आले आहे.