जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता जाणवू लागली आहे. पेट्रोल डिझेलसंदर्भात अफवांमुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दोन ते तीन दिवसात जिल्ह्यातला पेट्रोलचा साठा संपणार अशा पद्धतीची अफवा पसरल्यानंतर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.