यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई असल्याचं चुकीचं चित्र उभं केलं जात आहे. मात्र टंचाई नसली तरी काही जण एकाच वेळी येऊन शंभर लिटर पेट्रोल मागत आहेत. काही जण कॅनमध्ये पेट्रोल मागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणालाही कॅनमध्ये पेट्रोल देऊ नये, अशा सूचना पेट्रोल पंप मालकांना दिल्या असल्याचं जिल्हाधिकारी डॉ विकास मीना यांनी सांगितलं.