सौर कृषिपंप योजनेंतर्गत पात्र असूनही वेळेत लाभ न मिळाल्याने मेहकर तालुक्यातील भोसा येथील शेतकरी विष्णू चंदनसे यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले असून जुन्या महसूल कार्यालयाजवळील मोबाईल टॉवरवर चढून आपला रोष व्यक्त केला. शेतकरी विष्णू चंदनसे यांनी महावितरणकडे विहिरीवर वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरली होती.. मात्र कनेक्शन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी "मागेल त्याला सौर पंप योजना" अंतर्गत ऑनलाइन अर्ज करून १० टक्के अनामत रक्कमही भरली, तरीही गेल्या ८ ते 10 महिन्यांपासून त्यांना पंपाचा लाभ मिळालेला नाही.. या विलंबामुळे त्यांना पिकाला सिंचन करता येत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याने मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन केले.