अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथील शेतकरी अर्जुन चाटे यांच्या ज्वारीच्या पिकाचे रानडुकरांमुळे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या ज्वारीवर रानडुकरांनी हल्ला करून पीक उद्ध्वस्त केले, ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांनाही याचा फटका बसत असून, वन विभागाने तातडीने रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.