सोलापुरातील करमाळा तालुक्यातील नेरले इथला शेतकरी अजित सावंत यांच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. पावसाअभावी करपून चाललेल्या त्यांच्या 5 एकरातील उडीद आणि तुरीच्या पिकांवर त्यांनी अखेर रोटावेटर फिरवला आहे. पावसाअभावी खरीप हंगामाचं मोठं नुकसान झालं आहे.