जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील शेतकरी समाधान कळम यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावरील मिरचीचे पीक उपटून फेकले. लागवडीपासून 2 लाख रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित भाव मिळत नसल्याकारणाने या शेतकऱ्याने हे मिरचीचे पीक उपटून फेकून दिलं.