सिन्नरच्या देवकौठे शिवारात बुधवारी सकाळी मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले तरुण शेतकरी रामहरी कुदनर यांच्यासमोर अचानक बिबट्याची मादी आणि बछडा आले. जीव धोक्यात असतानाच, तिथे एका रानडुकराने प्रवेश केला. बिबट्याने आपल्या पिलाची शिकार केल्याच्या रागातून रानडुकराने बिबट्याच्या मादीवर प्रतिहल्ला केला. या झटापटीचा फायदा घेत रामहरी यांनी तिथून पळ काढला आणि त्यांचा जीव वाचला.